Devdatta Nikam
sakal
मंचर - कुकडी प्रकल्पातील हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे) ते माणिकडोह हा प्रस्तावित बोगदा कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. बोगद्यासाठी आंबेगाव, जुन्नर व शिरूर परिसरातील शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्यास राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी-प्रवरा येथील निवासस्थानासमोर डफडे वाजवून आंदोलन करू, असा इशारा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी गुरुवारी (ता. ३) दिला.