building construction
sakal
पुणे - विकास आराखड्यातील आरक्षण विकसित करण्याच्या मोबदल्यात देण्यात येणाऱ्या ‘टीडीआर’ (हस्तांतरित विकास हक्क) धोरणात राज्य सरकारने नव्याने बदल केला आहे. त्यामुळे एखादी आरक्षणाची जागा मालकाऐवजी त्रयस्थ व्यक्तीने विकसित करून दिल्यास त्याचा मोबदला म्हणून विकसकाला ‘कंस्ट्रक्शन टीडीआर’ देण्याची नवी तरतूद नियमावलीत केली आहे. त्यामुळे विकास आराखड्यात दर्शविण्यात आलेली सुविधांची आरक्षणे गतीने विकसित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.