''देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकदिवस एकत्र येणार''

Devendra Fadnavis and Ajit Pawar will come together one day said ramdas athawale
Devendra Fadnavis and Ajit Pawar will come together one day said ramdas athawale

पुणे- ''देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा एकदिवस पुन्हा एकत्र येणार आहेत. त्यामुळेच फडणवीस ''मी पुन्हा येईन, पुन्हा येईन'' म्हणतात असे वक्तव्य केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले आहे. 

नुकतेच एका कार्यक्रमात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी ''मी परत जाणार'' असे वक्तव्य केले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु होती. याबाबतचंद्रकांत पाटील यांचे मिशन पूर्ण झाल्यावरच ते कोल्हापूरला जाणार आहेत. ते मूळचे कोल्हापूरचे आहेत. पण आता पुण्यातच आहेत'' असे सांगत आठवले यांनी पाटील यांच्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, ''आम्ही सोबत असलो तरच दादांचं मिशन पूर्ण होईल. मी त्याबाबत लवकरच दादांना भेटेन. चंद्रकांतदादा इतक्या लवकर कोल्हापूरला जाणार नाहीत. ते फक्त कोल्हापूरला जाऊन येतील. त्यांचं तिथं घर आहे, असेही त्यांनी म्हटले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला त्यांच्याकडे येण्याचं निमंत्रण दिलं आहे. परंतु, मीच त्यांना आमच्याकडे येण्यास सांगितलं आहे, असे रामदास आठवले म्हणाले. त्याचबरोबर काँग्रेस बाळासाहेब थोरात यांना कधीही पाठिंबा काढायला सांगू शकते आणि हे सरकार कधीही पडू शकते. याचीच आम्ही वाट पाहत आहोत, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

आरपीआयमध्ये आता निवडणुका
येत्या 14 जानेवारीच्या आधी लोकशाही पद्धतीने आता पक्षात निवडणूक होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकीत भाजपसोबत निवडणूक लढण्यासाठी प्रयत्न करतोय, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com