
''सामनामध्ये काय लेख आला आहे याच्यावर बोलणार नाही. हे सरकार असंवेदनशील आहे. मागच्या 5 वर्षात शिवसेनेचा आरोग्यमंत्री होता. संबंधित हॉस्पिटलने 1.5 करोडची मागणी केली होती. परंतु सरकारने दिली नाही.
लोणवळा : ''शिवसेना गुजराती समाजास गोंजारत आहे. चांगलेच आहे. आनंद आहे. गुजराती समाजाला निवडणुकीसाठी का होईना समावेश केला जात आहे. एकीकडे शिवसेना अहमदाबाद मुंबई ट्रेनला विरोध करत आहे. तर दुसरीकडे हा कार्यक्रम घेत आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे पण आता जनाब बाळासाहेब ठाकरे झाले आहेत. उर्दू कॅलेंडर छापले जात आहे. निवडणुकीसाठी हे सर्व राजकारण केलं जातं आहे. हे आता लोकांना देखील समजू लागले आहे.'' अशी प्रतिक्रिया विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. लोणवळ्यात भाजप महिला मोर्चा राज्यस्तरीय कार्यकारणी कार्यक्रमासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
महाविकास आघाडी सरकार असंवेदनशील
''सामनामध्ये काय लेख आला आहे याच्यावर बोलणार नाही. हे सरकार असंवेदनशील आहे. मागच्या 5 वर्षात शिवसेनेचा आरोग्यमंत्री होता. संबंधित हॉस्पिटलने 1.5 करोडची मागणी केली होती. परंतु सरकारने दिली नाही. बिल्डरचे काही प्रश्न असतील तर लगेच मार्गी लागले जातात. केंद्र सरकारवर सगळे आरोप केले जातात. भांडरबाबत अद्याप एकही कारवाई झालेली नाही किंवा वाढीव मदत मिळाली नाही. हे सरकार असंवेदनशील आणि टोलवाटोलवी करणारे सरकार आहे.
नथूराम गोडसे यांचे समर्थन या देशात कोणीही करु शकत नाही : फडणवीस
नथूराम गोडसेंच्या नावाने मध्यप्रदेशात ज्ञानशाला सुरु होत आहे याबाबत विचारले असता, फडणवीस म्हणाले, ''नथूराम गोडसे यांचे समर्थन या देशात कोणीही करु शकत नाही. देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीची हत्या केली अशा व्यक्तीचे उदात्तीकरण होऊ शकत नाही. कोणी तसे करत असेल तर ते चूकीचे आहे''
शेतकरी आंदोलन
शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या मुद्यावर थेट संवाद साधण्याऐवजी राजकारण केले जाते आहे का? याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, ''दिल्लीतील आंदोलनाचे नेतृत्व डावे लोक करत आहेत. इतर लोकही आहेत. कित्येक शेतकरी परत निघून गेले आहेत. केंद्र सराकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत असतानाही आंदोलन सुरु ठेवून राजकारण केले जात आहे.''
बर्ड फ्लू संकट
व्यावसायिकांना मदत घ्यावी. राज्यात बर्ड फ्लूचे संकट हे मोठं संकट येत आहे. लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन करणारे व्यावसायिकांवर विपरित परिणाम झाला आहे. या बर्ड फ्लूच्या संकटावर सरकारने वेगाने कारवाई केली पाहिजे, शिवायकुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांना सरकारने आर्थिक मदत केली पाहिजे.'
सुरक्षेच्या मुद्यावर लक्ष देण्यापेक्षा सराकारने भंडाऱ्यांच्या घडनेकडे लक्ष द्या
राज ठाकरे यांच्यासह काही जणांची सुरक्षा काढली आहे तर वरुन देसाई यांना सुरक्षा दिली आहे. याबाबत, बोलताना ते म्हणाले, ''तुमच्या मनात असेल त्यांना सुरक्षा द्या. कोणालाही सुरक्षा दिली तरी आम्हाला काही आक्षेप नाही, कोणतीही तक्रार नाही. सुरक्षा काढणे आणि ठेवणे यांनी काही मला फरक पडत नाही. मी आजही महाराष्ट्रात गार्ड शिवाय फिरु शकतो. सुरक्षेच्या मुद्यावर लक्ष देण्यापेक्षा सराकारने भंडाऱ्यांच्या घडनेकडे लक्ष द्यावे.''
''भंडाऱ्यातील घडनेबाबत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा मागणी नागरिक करत आहे. कोणीही जाणीवपुर्वक चूक केली असेल किंवा एखाद्याने कर्तव्य पार पाडणे अपेक्षित असताना ते केले नसेल तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे'' अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.