
''राजा उदार नाही तर उधार झाला...'' : देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका
पुणे : ''शेतकऱ्यांना संरक्षण देणारे तीन कृषी कायदे आहेत. या कायद्यासंदर्भात स्वतः मोदी देशासमोर विवेचन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज 9 कोटी शेतकऱ्यांना खात्यावर पैसे ट्रान्स्फर करणार आहेत.'' अशी माहिती विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आज भाजपकडून 'शेतकरी शिवार संसद' हा कार्यक्रम संपूर्ण राज्यभर घेतला जात आहे. हा कृषी कायदा शेतकऱ्यांसाठी कशा पद्धतीने फायदेशीर आहे हे सांगितले जात आहे.
केंद्र सरकारने मंजुर केलेल्या तीन कृषी विधेयक कायद्यावरुन सध्या देशात अंसतोष निर्माण झालेले असून दिल्लीत या कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. दरम्यान या विधेयकाच्या समर्थनार्थ भाजपच्यावतीने देशभरात शेतकऱ्यांशी संवाद साधला जात आहे. राज्यात भाजप प्रदेशच्यावतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला.
स्ट्रॉबेरीसह आता महाबळेश्वरची केशर ही लवकरच मिळणार
तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही देशभरातील शेतकऱ्यांशी संवाध साधणार आहेत. दरम्यान, यावेळी बैलगाडीमधून निघणार रॅली काढण्यात आली. पुणे जिल्ह्यातील भुगाव येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते तर पुण्यातील मांजरी येथे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. दरम्यान, यावेळी बैलगाडीमधून निघणार रॅली काढण्यात आली. चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी बैलगाडी रॅलीत सहभाग घेतला.
यावेळी भाषणात फडणवीस पुढे म्हणाले,''शेतकऱ्याला त्याचा मालाचा आणि शेतीचा मालक करण्यासाठी मोदींनी हे कायदे आणले आहेत. काही लोकं कृषी कायद्यासंदर्भात दुट्टपी भूमिका घेत आहे. कंत्राटी शेती करताना काही वाद झालेत तर शेतकऱ्यांना आता कोर्टात जाता येणार आहे. हे या कायद्यात आहे.
पदाची झूल बाजूला सारून एकनाथ शिंदेंनी रुजवली मायभूमीत स्ट्रॉबेरी
तसेच,''राज्यातील सरकारने पीक विमा योजना बासनात गुंडाळून ठेवली. केळीच्या शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विम्याचे या सरकारने बदलल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्याना आता मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांचा आता विचार केला जात नाही.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकर्यांच्या बांधावर गेले होते तेव्हा 50 हजारी हेक्टरी देऊ असे म्हटलं होते, मात्र 8 हजार दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की ,बागायत शेतकर्यांना दीड लाख रुपये देऊ पण, पुढे ''राजा उदार नाही तर उधार झाला आणि हाती भोपळा आला'' अशी स्थिती झाली आहे. प्रामाणिक शेतकर्यांना ठेंगा दाखविण्याचे काम या सरकारने केले आहे.'' अशा शब्दात राज्य सरकारवर टीका केली आणि '' मोदी नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत आणि कायम राहतील असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना यावेळी दिला.
ख्रिसमसच्या सुट्टीमध्ये पुणेकर निघाले फिरायला! पुणे-बंगळूरू हायवेवर वाहतूक कोंडी
Web Title: Devendra Fadnavis Criticize Thackeray Government
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..