Devendra fadnavis : रामराज्य म्हणजे समाजातील शोषित,पिडीत बहुजनांच्या हिताचे लोककल्याणकारी राज्य; देवेंद्र फडणवीस

शुक्रवार ता.५ अटल विनामूल्य महा आरोग्य शिबीराचे सकाळी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
Devendra fadnavis
Devendra fadnavissakal

जुनी सांगवी : रामजन्मभूमी हे केवळ मंदिर नसून पाचशे वर्षांपासूनचा लागलेला कलंक येत्या २२ जानेवारीला प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याने पुसला जाणार आहे.ज्या अयोध्या नगरीत प्रभु श्रीरामांचा जन्म झाला.

त्याच जागेवर राष्ट्रीय अस्मिता ओळख राष्टाला मिळणार आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे रयतेचे राज्य होते.त्याचप्रमाणे रामराज्य म्हणजे समाजातील सर्व घटकांना शोषित, पिडीत बहुजनांच्या हिताचे कल्याणकारी राज्य म्हणजे रामराज्य होय असे सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर आयोजित अटल विनामूल्य आरोग्य शिबिरात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

शुक्रवार ता.५ अटल विनामूल्य महा आरोग्य शिबीराचे सकाळी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.सायंकाळी न्यू मिलेनियम स्कूल येथे लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने सुरू केलेल्या अटल विनामुल्य आरोग्य शिबिराला त्यांनी भेट दिली.यावेळी बोलताना फडणवीस पुढे म्हणाले, एकीकडे प्रगती होत असताना दुसरीकडे आरोग्याच्या समस्या वाढत आहेत सर्व सामान्यांचे आरोग्य चांगले राहावे.

त्यांना उपचार मिळावा यासाठी आमच्या सरकारने आयुष्मान आरोग्य योजना अंमलात आणली आहे.याचा सर्वसामान्य माणसाला फायदा होत आहे.यात वरचेवर प्रगती करण्यात येणार आहे. आमदार लक्ष्मण जगताप भाऊ हे सामान्य माणसांच्या गरजा ओळखणारे लोकनेते होते.

आज ते असते तर त्यांनी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात प्रभू श्रीराम मंदिर सोहळ्याचा जल्लोष साजरा केला असता.त्यांनी चालवलेला जनहित आरोग्याचा वारसा आमदार अश्विनीताई जगताप व त्यांचे बंधू शंकर जगताप हे यशस्वीपणे राबवत आहेत.हा वारसा असाच पुढे चालत राहावो अशा सदिच्छा दिल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांचे नाव न घेता त्यांनी श्रीरामा बद्दल केलेल्या वक्तव्याचा फडणवीस यांनी खरपुस समाचार घेतला.फडणवीस म्हणाले, काही लोकांना श्रीराम श्रीराम मंदिराचे दु:ख होत आहे.वाचाळवीर प्रसिद्धी साठी करोडो लोकांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करत आहेत.अशा लोकांना प्रभू श्रीरामच सद्बुद्धी देवो.

आमदार अश्विनीताई जगताप यांनी आरोग्य शिबिराबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले.शंकर जगताप म्हणाले,या शिबिरासाठी सुमारे दिड लाख नागरिकांनी नोंदणी केली आहे.पहिल्याच दिवशी ६६ हजार रूग्णांनी प्रत्यक्ष येवून तपासणी व उपचाराचा लाभ घेतला. दिड हजार डायलिसिस रुग्णांनी पहिल्या दिवशी लाभ घेतला.

यावेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, आमदार अश्विनीताई जगताप,माजी खासदार अमर साबळे, माजी मंत्री बाळासाहेब भेगडे, आमदार महेश लांडगे,आमदार उमा खापरे, माजी महापौर उषा ढोरे,पद्मश्री गिरिश प्रभुणे, अमित गोरखे, पिंपरी चिंचवड शहरातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कर नाही त्याला डर कशाला - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जुनी सांगवी, पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी येथे लोकनेते लक्ष्मण जगताप मित्र परिवाराच्या वतीने आयोजित अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिराच्या ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य मुर्खपणाचे आहे.प्रसिद्धीसाठी लोकं काही करतात.बदनाम हूये तो क्या हुआ नाम तो हो हुआ अशी काहींची धारणा आहे.

रोहित पवार यांचे उद्योग व्यवसाय ही आहेत.त्यांच्याकडे रेड पडली काय रेड पडली याची अजून मला माहिती नाही.त्यांनी काही केलेच नसेल तर कर नाही तर डर कशाला असे पत्रकारांनी पवारा बाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले.

पुण्यातील गॅंगवार घटनेतील झालेल्या खुन प्रकरणाबाबत पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, पुण्यातील खुन प्रकरण साथीदाराने केले आहे.पुण्यात कुठलाही गॅंगवार होणार नाही. कुख्यात गुंड कोणीही असो त्याचा योग्य तो बंदोबस्त शासन करेल.कोणीही हिम्मत करणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com