Fadnavis Slams Opponents Over "Empty Promises" in Pune Rally
sakal
पुणे : पुणे महापालिकेची निवडणूक गल्लीबोळात दादा निर्माण करण्यासाठी नाही तर पुण्याची भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. काही मोठी आश्वासने देत आहेत. खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा अशी त्यांची आश्वासने आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. १५ जानेवारीला तुम्ही सर्वांनी कमळाची काळजी घ्या, पुढचे पाच वर्ष आम्ही तुमची काळजी घेऊ असे आवाहनही फडणवीस यांनी केले.