esakal | देवेंद्र फडणवीस हेच मोदी अन्‌ शहा -  संजय काकडे
sakal

बोलून बातमी शोधा

देवेंद्र फडणवीस हेच मोदी अन्‌ शहा -  संजय काकडे

""राज्यसभेच्या तिसऱ्या जागेवर उमेदवारी मिळविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्याची गरज नाही. माझ्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र हेच मोदी आणि शहा आहेत. मी त्यांचा मोहरा आहे, असे सांगत तिसऱ्यांदा राज्यसभेत जाण्यासाठी फडणवीस मदत करतील,'' असे खासदार संजय काकडे यांनी शुक्रवारी सूचित केले.

देवेंद्र फडणवीस हेच मोदी अन्‌ शहा -  संजय काकडे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - ""राज्यसभेच्या तिसऱ्या जागेवर उमेदवारी मिळविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्याची गरज नाही. माझ्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र हेच मोदी आणि शहा आहेत. मी त्यांचा मोहरा आहे, असे सांगत तिसऱ्यांदा राज्यसभेत जाण्यासाठी फडणवीस मदत करतील,'' असे खासदार संजय काकडे यांनी शुक्रवारी सूचित केले. माझ्यासाठी फडणवीस हेच मोदी, शहा यांच्याशी बोलतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यसभा निवडणुकीत भाजपला तीन जागा निवडून आणणे शक्‍य आहे. त्यातील दोन जागा केंद्रीय मंत्री रामदास आठवले व छत्रपती उदयनराजे भोसले यांची वर्णी लागेल, असा अंदाज आहे. तिसऱ्या जागेसाठी कोण? याची चर्चा रंगली असून, त्यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष विजया रहाटकर यांच्यासह काकडे, अमर साबळे यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्‍याम जाजू यांच्याही नावाची भर पडली आहे. या चौघांमधून एकाला संधी मिळेल, असे सांगण्यात येत आहे. या तिसऱ्या जागेवर आपला दावा सांगताना काकडे यांनी छत्रपती उदयनराजे यांचे पक्षासाठी योगदान काय? असा प्रश्‍न उपस्थित केल्याने चर्चेला उधाण आले. 

""पक्षाची पुणे महापालिकेत सत्ता आणण्यासाठी केलेले काम सर्वांनी पाहिले आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही मोठी जबाबदारी पाडली आहे. पक्ष नोंदणीत दीड लाख सदस्यांची नोंदणी एकट्याने केली आहे. गेल्यावेळी स्वतंत्र खासदार म्हणून निवडून आलो. त्यानंतर भाजपचा सहयोगी सदस्य झालो. या वेळी मी पक्षाकडे अधिकृत उमेदवारी मागत आहे. पक्ष याचा नक्की विचार करेल. पक्षाने उमेदवारी दिली नाही तरी शांत बसेन. कारण, आमचा पक्ष एक शिस्त पाळणारा आहे. पक्षाच्या चौकटीत काम करणारा मी कार्यकर्ता आहे.'' 
- संजय काकडे, खासदार 

loading image