
पुणे : ‘‘पुण्याच्या वाहतुकीचा प्रश्न सर्वांत महत्त्वाचा आहे. तो सोडविण्यासाठी पुण्यात उपग्रहाचा उपयोग करून ‘अत्याधुनिक एकात्मिक वाहतूक नियंत्रण प्रणाली’ (कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटेलिजंट मॅनेजमेंट सिस्टीम) ५०३ चौकांत उभारण्यात येणार आहे. त्यातून वाहतुकीचा कमी झालेला वेग वाढविण्यावर भर देण्यात येईल,’’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिस आयुक्तालयातील विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी दिली.