

Girija Oak Devendra Fadnavis
esakal
Pune Mahanagar Palika Election: पुणे महापालिका निवडणुकीत पुण्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी विकासाचा ठोस आराखडा पुणेकरांसमोर मांडण्यासाठी भाजपतर्फे ‘संवाद पुणेकरांशी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध मराठी अभिनेत्री गिरिजा ओक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लाइव्ह टॉक शोच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम रविवार (ता. ११) सायंकाळी ७ वाजता होणार आहे.