देवेंद्र फडणवीस राऊतांकडे चहा प्यायला नाही विसरले, कारण...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 December 2019

कोण आहेत दशरथ राऊत
कुलदैवताला नेहमीच येत असल्यानं देवेंद्र फडणविसांचा परिचय झाला तो मंदिरासमोर हॉटेल चालवणाऱ्या दशरथ राऊत यांच्याशी. तेव्हापासून आजतागायत फडणवीस आणि राऊत यांच्यात एक प्रकारे जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालंय. त्यामुळंच फडणवीस हे आज विरोधी पक्ष नेता पदावर असतानाही राऊत यांचा चहा पिणं सोडलेलं नाही. यातूनच फडणवीस यांनी जपलेल्या मैत्रीची प्रचिती येते.

इंदापूर : मैत्रीचे किस्से आपण ऐकत असतो. अशीच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नीरा नरसिंहपूर इथल्या चहावाल्याची मैत्री इंदापूर आणि बारामती परिसरातील चर्चेचा विषय आहे. त्यामुळंच माजी मुख्यमंत्री न चुकता या चहावाल्याचा चहा पिल्याशिवाय जात नाहीत. 

देवेंद्र फडणवीस हे नगरसेवकपदापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारलेलं व्यक्तिमत्व आहेत. राज्याच्या राजकारणात फडणवीस यांनी विविध पदे भूषवली. आज ते राज्याचे विरोधी पक्ष नेते आहेत. मात्र त्यांचे जुन्या काळापासून असलेले ऋणानुबंध आजही कायम असल्याचं दिसते.

इंदापूर तालुक्यातल्या निरा आणि भिमा नद्यांच्या प्रिती संगमावरील श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर या गावी असलेलं श्री लक्ष्मी नृसिंह हे फडणवीस कुटुंबियांचं कुलदैवत आहे. वर्षातून किमान एकदा तरी फडणवीस कुटुंबिय या मंदिरात दर्शनासाठी येतात. 
फडणवीस यांनी आज इंदापुर तालुक्यातील नरसिंहपुर येथे आपल्या कुलदैवताची पूजा केली. या पूजेनंतर फडणवीस मंदिरातून बाहेर जात असताना पोलिस आणि लोकांच्या गराड्यातील एका सामान्य माणसाने त्यांना चहा पिण्याचा बोलवले की फडणवीस राऊत यांच्या टपरी वजा हॉटेलात चहा पितात. आज ही ते आले चहा पिले असे राऊत यांनी सांगितले.

कोण आहेत दशरथ राऊत
कुलदैवताला नेहमीच येत असल्यानं देवेंद्र फडणविसांचा परिचय झाला तो मंदिरासमोर हॉटेल चालवणाऱ्या दशरथ राऊत यांच्याशी. तेव्हापासून आजतागायत फडणवीस आणि राऊत यांच्यात एक प्रकारे जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालंय. त्यामुळंच फडणवीस हे आज विरोधी पक्ष नेता पदावर असतानाही राऊत यांचा चहा पिणं सोडलेलं नाही. यातूनच फडणवीस यांनी जपलेल्या मैत्रीची प्रचिती येते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis visit Nira Narsinghpur near Indapur