

Devendra Fadnavis Issues Stern Warning to New Corporators
sakal
पुणे : पुणेकरांनी दिलेला जनादेश हा सत्तेचा माज मिरविण्यासाठी नाही, तर जबाबदारी उचलण्यासाठी आहे. महापालिका हा व्यवसाय नाही, कमिशनचा धंदा नाही. त्यामुळे तुम्ही गैरकारभार, उन्माद केल्यास तो खपवून घेतला जाणार नाही,” अशा थेट शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना इशारा दिला. तसेच पाच वर्ष काय काम करणार याचे नियोजन तयार करा असा सल्लाही दिला.