

Devendra Fadnavis’ Wedding Blessings to Pooja More–Dhananjay Jadhav Resurface Amid BJP Controversy
esakal
पुणे : भाजप नेत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या पूजा मोरे-जाधव यांची सध्या राज्यभर चर्चा आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपने प्रभाग क्रमांक २ मधून त्यांना तिकीट दिले होते. मात्र, उमेदवारी जाहीर होताच पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले. पूजा मोरे यांचे जुने व्हिडिओ फिरवले गेले, ज्यात त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना दिसत होत्या. या ट्रोलिंगच्या तीव्रतेमुळे पूजा मोरे-जाधव यांना अर्ज मागे घेण्याची नामुष्की ओढवली. अखेर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि भाजपला त्या जागेवर नव्याने उमेदवार शोधावा लागला.