Devendra Fadnavis : "विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही" देवेंद्र फडणवीस

लोकसभेच्या बारामती मतदार संघातील गावांना निधी कमी पडू न देता विकास रखडलेल्या या भागाचा विकास करणार आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSakal

फुरसुंगी : लोकसभेच्या बारामती मतदार संघातील गावांना निधी कमी पडू न देता विकास रखडलेल्या या भागाचा विकास करणार आहे.असे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुरसुंगीमध्ये झालेल्या प्रचारसभेत बोलताना सांगितले.यावेळी सभेला नागरिकांनी प्रतिसाद देत गर्दी केली होती.

महापालिकेत समाविष्ट होऊन देखील या भागाचा आवश्यक विकास झाला नाही.येथील मिळकत कर ज्या प्रमाणात सुविधा मिळतील त्याच प्रमाणात आकारण्यासाठी प्रयत्न करणार आहे.असे फडणवीस यांनी सभेत बोलताना सांगितले.कांचन कुल याना दिलेले साडे पाच हजारांचे लीड हे डबल करून सुनेत्रा पवार यांना येथील जनता नाक्किच निवडून देणार असेही ते यावेळेस म्हणाले.

बारामती लोकसभा मतदार संघातील फुरसुंगी भेकराईनगर येथे महायुतीचे उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सभेचे आयोजन केले होते. याप्रसंगी महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार,

माजी मंत्री विजय शिवतारे,भाजप जिल्हा अध्यक्ष वासुदेवनाना काळे, माजी आमदार अशोक टेकवडे, पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जालिंदर कामठे, प्रा. दिगंबर दुर्गाडे, मंगलदास बांदल, माजी नगरसेवक गणेश ढोरे, संदीप हरपळे आदी उपस्थित होते.

विजय शिवतारे म्हणाले,येथील पाणीप्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मार्गी लावला. सुप्रिया सुळे यांनी एका रुपयाचे देखील काम केले नाही. ही निवडणूक भावकीची नसून देशाची आहे त्यामुळे अजित दादा जो शब्द देतील तो आम्ही सर्वजण पूर्ण करू.

उमेदवार सुनेत्रा पवार यांनी सांगितले,महायुतीचे एक मजबूत संघटन निर्माण झाले आहे. देशाच्या विकासासाठी आपल्याला नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचा आहे. यासाठी फुरसुंगी उरळीदेवाच्या मतदारांनी भरगोस मातांनी निवडून द्यावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com