shaneshwar maharaj shila darshansakal
पुणे
Manchar News : मंचरजवळ गोरक्षनाथ टेकडीवर शनी अमावस्येला भाविकांची गर्दी; पहाटे चार पासून दर्शनासाठी रांगा
श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आणि शनी अमावस्या एकाच दिवशी आल्याने गोरक्षनाथ टेकडीवर शनिवारी शनैश्वर महाराजांच्या शिळेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली.
मंचर - श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आणि शनी अमावस्या एकाच दिवशी आल्याने मंचरजवळील शेवाळवाडी- तांबडेमळा, (ता. आंबेगाव) येथील गोरक्षनाथ टेकडीवर शनिवारी (ता.२३) शनैश्वर महाराजांच्या शिळेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली. 'शनेश्वर महाराज की जय' या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. दिवसभरात तब्बल वीस हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले.