
जुनी सांगवी : मुखी विठ्ठल नामाचा गजर, मंदिरांमधून दर्शनासाठी गर्दी,आषाढी एकादशीनिमित्त जुनी सांगवी परिसरात भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. यावेळी समस्त सांगवीकर व प्रशांत शितोळे मित्र परिवार, सिझन सोशल ग्रुप यांच्या वतीने यौदाही सजवलेल्या १२ फूट उंच भव्य विठ्ठल मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी शेकडो भाविकांनी गर्दी केली होती. पारंपरिक वेशभूषा, अभंग, भजन, ढोल-ताशांचा गजर, आणि सामुहिक टाळ-मृदुंग वादन यामुळे परिसर विठ्ठलमय झाला.