
पिंपरी : भर पावसातही मुखातून अखंड सुरू असणारा हरिनामाचा जप, टाळ मृदंगांच्या नादात ‘ज्ञानोबा -तुकोबारायांचा’ होणारा जयघोष, विठुरायाच्या ओढीने वेगात पडणारी पावले, खांद्यावर भगवी पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन आणि पंढरीकडे जाण्याची आस लागलेले वारकरी आणि त्यांच्या स्वागतासाठी उसळलेला जनसागर असे चित्र उद्योगनगरीचे प्रवेशद्वार असणाऱ्या भक्ती शक्ती समूहशिल्प येथील चौकात अनुभवायला मिळाले.