Success Story: भोरची देवयानी बढे जर्मन परीक्षेत राज्यात प्रथम
Zilla Parishad School: भोर तालुक्यातील धोंडेवाडीच्या देवयानी बढे हिने जर्मन ऑलिम्पियाड परीक्षेत ५० पैकी ५० गुण मिळवत संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला. लहानपणीच आईवडील गमावलेल्या देवयानीचे यश सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
हिर्डोशी : धोंडेवाडी (ता. भोर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील देवयानी बढे हिने सातवीत दिलेल्या जर्मन ऑलिम्पियाड (ए वन) परीक्षेत ५० पैकी ५० गुण मिळवत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.