पानीव महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत यश
BON26B01861
सोलापूर : येथे आयोजित डेक्स्टर इनोफेस्ट स्पर्धेतील विजेत्या आरती मगरला पारितोषिक वितरण करताना कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर व इतर मान्यवर.
......
पानीवचे श्रीराम इन्स्टिट्यूट
‘डेक्स्टर इनोफेस्ट’मध्ये अव्वल
.......
बोंडले, ता. १४ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘डेक्स्टर इनोफेस्ट २०२५-२६’ या राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेत पानीव (ता. माळशिरस) येथील श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी अव्वल स्थान पटकाविले. विद्यार्थ्यांतील नवकल्पना व तांत्रिक कौशल्ये विकसित होण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत तांत्रिक, प्रोग्रॅमिंग आणि पेपर प्रेझेंटेशन स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये पानीव महाविद्यालयातील आरती जयसिंग मगर हिने उल्लेखनीय कामगिरी करत हे यश मिळविले. तर सायली संतोष अडसर ही प्रोत्साहनपर बक्षिसास पात्र ठरली. या स्पर्धा सोलापूर विद्यापीठातील संगणक विज्ञान विभागाद्वारे घेण्यात आल्या. विजेत्या स्पर्धकांना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
या यशाबद्दल श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, मार्गदर्शक श्रीलेखा पाटील, उपाध्यक्ष करण पाटील, सचिव अॅड अभिषेक पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी भाऊसो वणवे, प्राचार्य डॉ. सुनील सावंत, उपप्राचार्य राजेंद्र डावकरे यांच्यासह शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सन्मान केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

