esakal | मुंडेंच्या प्रकरणात शरद पवार यांनी नैतिकतेने निर्णय घ्यावा - चंद्रकांत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

chandrakant patil pc over dhananjay munde alligation

धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांनंतर राज्यात विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने उचलून धरली आहे.

मुंडेंच्या प्रकरणात शरद पवार यांनी नैतिकतेने निर्णय घ्यावा - चंद्रकांत पाटील

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे - धनंजय मुंडे याच्यावरील आरोप हे गंभीर स्वरुपाचे आहेत. अशा प्रकरणांमध्ये अनेक नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. शरद पवार यांनी मुंडेंच्या प्रकरणात नैतिकतेनं निर्णय घ्यावा असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांनंतर राज्यात विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली आहे. दरम्यानच्या काळात धनंजय मुंडे यांच्यावर आरोप कऱणाऱ्या महिलेविरोधातच भाजपसह इतर काही नेत्यांनी तक्रार केल्यानं या प्रकरणाला वेगळं वळण लागलं होतं. 

आता पुन्हा एकदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या रेणु शर्मा यांचीही चौकशी करण्यात यावी असंही पाटील यांनी म्हटलं.  याप्रकऱणामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माझ्या वक्तव्यामध्ये कोणतीच मतभिन्नता नाही असंही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं. 

धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी सोमवारपासून आंदोलन केलं जाईल असा इशाराही दिला आहे. तसंच रेणू शर्मा यांची चौकशी करा आणि त्यात काय खरं खोटं आढळलं तर कारवाई करा असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. 

loading image