'शनिवारवाड्याला, पेशवे-होळकरवाडा नाव द्या'; मेळाव्यानंतर धनगर समाजाची मागणी

टीम ई-सकाळ
शनिवार, 25 जानेवारी 2020

बाजीराव पेशवे (दुसरा) हा यशवंतराव होळकरांचा होळकर साम्राज्या वरील हक्क नाकारत होता. शेवटी असंख्य प्रयत्न निष्फळ ठरल्या नंतर, महाराजा यशवंतराव होळकरांनी इंदौरवरून येत हडपसर येथे पेशव्या विरुद्ध २५ ऑक्टोबर १८०२ रोजी लढाई केली. 

पुणे : धनगर समाजाचा आज, पुण्यात मेळावा झाला. त्यात धनगर समाजाच्या इतिहासाला उजाळा देण्यात आला त्याचवेळी पुण्यातील शनिवार वाड्याला पेशवे-होळकर वाडा असे नाव द्यावे अशी मागणी करण्यात आली. तसेच हडपसर येथे यशवंतराव होळकर यांच्या पेशव्यांवरील विजयाच्या प्रित्यर्थ विजयस्तंभ उभारण्याची घोषणा करण्यात आली. धनगर समाज बांधव एकत्र येऊन हा विजयस्तंभ उभारणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याचा शनिवार वाडा यशवंतराव होळकरांच्या ताब्यात जवळपास सहा महिने होते. आम्हाला कोणाला कमी लेखायचे नाही. पण, आम्हाला आमच्या पूर्वजांचा जाज्ज्वल्या इतिहास आम्हाला आमच्या तरुण पिढीला सांगायचा आहे. त्यामुळं शनिवारवाड्याला आता पेशवे-होळकर वाडा असे नाव द्यावे, अशी आमची मागणी आहे.
- प्रकाश शेंडगे, माजी आमदार

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मेळाव्यात सांगितला इतिहास
बाजीराव पेशवे (दुसरा) हा यशवंतराव होळकरांचा होळकर साम्राज्या वरील हक्क नाकारत होता. शेवटी असंख्य प्रयत्न निष्फळ ठरल्या नंतर, महाराजा यशवंतराव होळकरांनी इंदौरवरून येत हडपसर येथे पेशव्या विरुद्ध २५ ऑक्टोबर १८०२ रोजी लढाई केली. या युद्धाकडे साऱ्या हिंदुस्तानचे लक्ष लागून राहिलेले होते. पेशव्यांच्या बलाढ्य पुण्यावर निजामानंतर कोणीही स्वारी करण्याचे धाडस केले नव्हते. या लढाईत महाराजा यशवंतराव होळकरांचा संपूर्ण विजय झाला. ही लढाई इतिहासात “हडपसरची लढाई” म्हणून प्रसिद्ध आहे. लढाईतील पराभव आणि महाराजा यशवंतराव होळकरांच्या भीतीमुळे बाजीराव पेशवा (दुसरा) सिंहगड मार्गे कोकणात पळून गेला, अशी माहिती मेळाव्यात देण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhangar community demand change name of shaniwar wada pune