
धनकवडी : उझबेकिस्तान येथे झालेल्या १९ वर्षाखालील सेंट्रल एशियन व्हॉलिबॉल चॅम्पियन स्पर्धेत धनकवडीतील अलोक तोडकर याने आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रॉन्झपदक पटकावून देशाची मान उंचावली आहे. भारतीय व्हॉलिबॉल संघाने ब्रॉन्झपदक पटकाविले. संघात आलोक हा महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू होता.