Dhanori Garbage Problem : धानोरी परिसरात साचले कचऱ्याचे ढीग, नागरिक त्रस्त; सहआयुक्तांच्या दालनात कचरा टाकण्याचा इशारा
PCMC Waste Management Issue : धानोरी परिसरातील कचरा न उचलल्यामुळे नागरिक त्रस्त असून, PMC प्रशासनाला आठ दिवसांची मुदत देत संस्थेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
विश्रांतवाडी : धानोरी परिसरातील सर्वच भागात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यामुळे दुर्गंधी पसरत असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कचरा उचलणाऱ्या गाड्या नियमितपणे येत नाहीत. पर्यायाने नागरिकांना रस्त्यावर कचरा टाकावा लागतो.