Shri Bhairavnath Yatra : धानोरी येथील श्री भैरवनाथ यात्रा उत्साहात संपन्न

श्री भैरवनाथ महाराजांचा अभिषेक, काकड आरती करण्यात आली. देवाची पालखी (छबीना) ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आला.
dhanori shri bhairavnath yatra palkhi culture pune wrestling competition
dhanori shri bhairavnath yatra palkhi culture pune wrestling competitionSakal
Updated on

विश्रांतवाडी - दरवर्षीप्रमाणे धानोरी गावची यात्रा व ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. श्री भैरवनाथ महाराजांचा अभिषेक, काकड आरती करण्यात आली. देवाची पालखी (छबीना) ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आला.

तसेच विठाबाई (भाऊ) नारायणगावकर यांचा लोकनाट्य तमाशाचा सांस्कृतिक कार्यक्रम व हजेरी (बतावणी/वग) यांचे आयोजन करण्यात आले. दरवर्षी प्रसिद्ध असलेला कुस्त्यांचा जंगी आखाडा याही वर्षी आयोजित करण्यात आला.

dhanori shri bhairavnath yatra palkhi culture pune wrestling competition
Pune Crime : लग्नाच्या आमिषाने तरुणीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

यामध्ये रक्कम रुपये पाच हजार ते 1 लाखापर्यंत इनाम देण्यात आले. पाच विजयी मल्लांना चांदीची गदा देण्यात आल्या. मानाची शेवटची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी खालकर तालीमचा पृथ्वीराज मोहोळ व उपमहाराष्ट्र केसरी आंतरराष्ट्रीय संकुलचा योगेश पवार यांच्यामध्ये झाली. त्यामध्ये पृथ्वीराज मोहोळ विजयी झाला.

दोन दिवस चाललेल्या या यात्रेत धानोरी व आसपासच्या परिसरातील रहिवश्यांनी देवाचे दर्शन घेतले व यात्रेचा आनंद घेतला, अशी माहिती आयोजनातील प्रमुख कार्यकर्ते व जाणता राजा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष शशिआण्णा टिंगरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com