थोरांदळेतील धनश्री राज्यकर निरीक्षकपदी

थोरांदळेतील धनश्री राज्यकर निरीक्षकपदी
Published on

निरगुडसर, ता. १९ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील शेतकरी कन्या धनश्री टेमगिरे हिने देदीप्यमान यश संपादन केले आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिची ‘राज्यकर निरीक्षक’ (STI) पदी निवड झाली असून, तिच्या या यशामुळे तालुक्यात कौतुकाचा वर्षाव होत आहे.
धनश्रीचे प्राथमिक शिक्षण थोरांदळे येथील जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षण मंचरच्या महात्मा गांधी विद्यालयात झाले. नाशिक येथील के. के. वाघ महाविद्यालयातून तिने कृषी अभियांत्रिकीची पदवी घेतली. स्पर्धा परीक्षेच्या दुसऱ्या प्रयत्नात अवघ्या पाच गुणांनी यश हुलकावणी दिली असताना, खचून न जाता तिने तिसऱ्या प्रयत्नात हे यश खेचून आणले. ती इतर मागास प्रवर्ग (मुली) गटातून १० वी, तर खुल्या प्रवर्गातून ३२६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तिला वडील टेमगिरे आणि आई (पोलिस पाटील) वैशाली टेमगिरे यांचे खंबीर पाठबळ लाभले.

दुसऱ्या प्रयत्नात पाच गुणांनी अपयश आल्यावर मी खचले होते, अभ्यास सोडण्याचा विचार केला होता. मात्र, आई-वडिलांनी दिलेल्या पाठबळामुळे मी पुन्हा जिद्दीने अभ्यास केला आणि त्यांचे स्वप्न साकार केले.
- धनश्री टेमगिरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com