

धारावी पुनर्विकासातील
घरांची उभारणी सुरू
माटुंगा येथे १० इमारतींच्या कामाचे भूमिपूजन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत कायापालट केला जाणार आहे. त्यानुसार आज माटुंगा येथील रेल्वेच्या २२ एकर जागेवर तब्बल १० हजार ४३२ पुनर्वसन घरे आणि १,३७९ व्यावसायिक, औद्योगिक गाळे असलेल्या १० इमारती उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन पार पडले. सेक्टर एक आणि सहामधील पात्र रहिवाशांना माटुंगा येथील घरे प्रथम मिळणार असून, त्यानंतर सुमारे ४,५०० सदनिका धारावीतील इतर पात्र रहिवाशांना प्राधान्यक्रमानुसार दिल्या जाणार आहेत.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाची विशेष हेतू कंपनी (एसपीव्ही) असलेल्या ‘अदानी नवभारत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड’कडून (एएनडीपीएल) रहिवाशांचे मूळ जागी पुनर्वसन या योजनेअंतर्गत पात्र रहिवाशांना ३५० चौरस फुटांची घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यानुसार आज ‘अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड’चे (एईएल) संचालक प्रणव अदानींच्या हस्ते माटुंगा येथील पुनर्वसन घरांच्या उभारणीचे भूमिपूजन पार पडले. प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित वाटेल आणि भविष्याचे नियोजन करता येईल, असे घर मिळायला हवे. धारावीतील कुटुंबांसाठी याचा काय अर्थ आहे, हे आम्ही जाणतो. त्यामुळे कुटुंबांना अधिक चांगले जीवन व्यतीत करता येईल आणि आपल्या मुलांसाठी उज्ज्वल भविष्य घडवता येईल, अशा वसाहती आम्ही निर्माण करत आहोत, असे या वेळी प्रणव यांनी स्पष्ट केले. या वेळी नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे आणि ‘एसआरए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, ‘एएनडीपीएल’चे सीईओ अनिल सरदाना आदी उपस्थित होते.
...
मार्च २०२९ पर्यंत पाच इमारतींचे हस्तांतरण
धारावी पुनर्वसन प्रकल्प/झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे या १० इमारती तीन टप्प्यांत हस्तांतरित केल्या जातील. पहिल्या पाच इमारती मार्च २०२९ पर्यंत, त्यानंतरच्या दोन इमारती ऑगस्ट २०२९ पर्यंत, तर उर्वरित तीन इमारती ऑगस्ट २०३० पर्यंत हस्तांतरित केल्या जाणार आहेत.
...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.