

त्र्यंबकेश्वर : येथील कुशावर्तावर धर्मध्वजाचे पूजन करताना कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, दहा आखाड्याचे साधू-महंत आदी.
कुशावर्त तीर्थावर धर्मध्वजाची स्थापना
कुंभमेळामंत्री महाजन यांच्या हस्ते पूजनासह प्रतिष्ठापना
सकाळ वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर, ता. १५ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर आज ३१ फुटी धर्मध्वजाची धार्मिक व पारंपरिक विधींनुसार पूजा करून तीन वर्षांसाठी स्थापना करण्यात आली. कुंभमेळामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते हा सोहळा झाला. स्थानिक पुरोहित संघाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला दशनाम आखाड्यातील साधू-महंतांसह मान्यवर उपस्थित होते.
कुशावर्त तीर्थावर आगमन झाल्यानंतर मंत्री महाजन यांनी उपस्थित साधू-महंतांचे शाल व पुष्पमाला देऊन स्वागत केले. त्यानंतर पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज शेटे व सदस्यांच्या उपस्थितीत धर्मध्वजा आरोहण स्तंभाच्या प्रतिष्ठापना विधीला प्रारंभ झाला. गणेशपूजा, स्वस्तिश्री पुण्याहवाचन आणि सिंहस्थ निर्विघ्नपणे पूर्ण होण्यासाठी धर्मध्वजा आरोहण स्तंभाची पूजा मंत्रोच्चारात करण्यात आली. या वेळी नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्यासह पदाधिकारीही उपस्थित होते. कुंभमेळा कालावधीसाठी विशेष तयार करण्यात आलेल्या धर्मध्वजाच्या तळाशी समुद्रमंथनातून प्राप्त झालेल्या रत्नांचे प्रतीकात्मक चित्रण आहे. तसेच दोन्ही बाजूंना श्रीगणेशाच्या मूर्ती, एका बाजूला अमृतकलश व गरुडाची प्रतिमा आणि पुरोहित संघाचे चिन्ह साकारण्यात आले आहे. धार्मिक परंपरेचे प्रतीक असलेल्या या धर्मध्वजाची तीन वर्षांसाठी स्थापना करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.