युती न झाल्यास भाजपला फक्त २६ ते २८ जागा: रामदास आठवले

Ramdas-Athawale
Ramdas-Athawale

दौंड- 2019च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजप, शिवसेना व रिपाईं यांची युती झाल्यास राज्यातील ४८ पैकी ४४ जागा मिळतील. युती मध्ये शिवसेना न राहिल्यास भाजप-रिपाईं युतीला २६ ते २८ जागा मिळतील व त्यामध्ये दोन जागा रिपाईंच्या असतील, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. 

दौंड शहरात रविवारी राज्य राखीव पोलिस दलाच्या विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना रामदास आठवले यांनी हा विश्वास व्यक्त केला. आमदार राहुल कुल यांच्यासह परशुराम वाडेकर, सूर्यकांत वाघमारे, विकास कदम, प्रकाश भालेराव, आदी या वेळी उपस्थित होते.

रामदास आठवले म्हणाले, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी युवा पिढीत आकर्षण असून, ते मतदारांच्या मनावर प्रभाव पाडण्यात हुशार आहेत. जीएसटी मुळे व्यापारी खुश नाही परंतु तीन वेळा मोठे बदल करण्यात आले आहेत व काही केले जातील. तीन तलाक संबंधी कायद्यामुळे ४० टक्के मुस्लिम महिलांची मते भाजपला मिळतील. दलित समाज मोदींच्या पाठीशी आहे. नोटबंदीचा सकारात्मक परिणाम होईल. देशात सगळ्या गोष्टी आलबेल नाही परंतु, देशात एकदम विरोधी वातावरण आहे, असे चित्र देखील नाही. लोकसभा निवडणुकीत भाजप ३०० जागांच्या पुढे जाईल. काँग्रेस पक्ष मात्र १०० जागांच्या पुढे जाईल, अशी शक्यता नाही''. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासंबंधी एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ''श्री. पवार पंतप्रधान झाले तर आनंद होईल परंतु नरेंद्र मोदी आहे तोपर्यंत पवार पंतप्रधान होणे अशक्य आहे. तिसर्या आघाडीच्या आधारे ते पंतप्रधान होणार नाहीत''. 

ते पुढे म्हणाले, ''उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकत्र आलेले समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र येणार नाहीत. पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा भाजपने राज्यसभा निवडणुकीत काढलेला आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला ५० जागा मिळतील.

रामनवमीची आठवण करून देताच हजरजबाबीपणाने रामदास आठवले यांनी ''नावात आहे राम, अॅट्रोसिटी कायद्याला सपोर्ट करणे माझे काम'' ही चारोळी सादर केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com