

Sinhagad Road Traffic
sakal
सिंहगड रस्ता : धायरी फाटा आणि सिंहगड रस्ता परिसरात वाढत चाललेली वाहतूक कोंडी आता गंभीर होत असून त्याचा थेट परिणाम वीर बाजी पासलकर उड्डाण पुलाखालील चौक आणि पुलावरून येणाऱ्या वाहतुकीवर होत आहे. फाट्यावर अडथळे निर्माण झाल्याने वाहनांची वेग मंदावून काही वेळातच संपूर्ण परिसरातील वाहतूक ठप्प होते. त्यामुळे धायरी फाटा मोकळा करून रस्त्याची पुनर्रचना, पार्किंग आणि भाजी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागा अशा उपाययोजना करण्याची मागणी होत केली आहे.
काही दिवसांपूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या भागाची पाहणी करून अतिक्रमण, बेशिस्त पार्किंग आणि बॉटल नेकच्या समस्येवर नाराजी व्यक्त करत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या.