
धायरी : धायरीतील पारी कंपनी चौकातील बांधून तयार असलेले अग्निशमन केंद्र तत्काळ सुरू करावे, अशी मागणी धायरी व नऱ्हे परिसरातील नागरिक, स्थानिक संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. या केंद्राचे बांधकाम पूर्ण होऊनही ते अद्याप कार्यान्वित झाले नाही. परिणामी, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना सिंहगड रस्त्यावरील किंवा इतर दूर असलेल्या केंद्रांवर अवलंबून राहावे लागत आहे.