पुणे - पुणे शहर भाजपच्या शहराध्यक्षपदी पुन्हा एकदा धीरज घाटे यांना संधी देण्यात आली असून, आज (ता. १३) त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
भाजपतर्फे राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष निवडण्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. पुण्यामधून धीरज घाटे, माजी सभागृहनेते गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले, माजी नगरसेविका वर्षा तापकीर यांनी संधी मिळावी यासाठी प्रयत्न सुरु केले होते.