

निगडी, ता.५ ः निगडी, रुपीनगर, सहयोगनगर, त्रिवेणीनगर, पेठ क्र.२२ मध्ये ढोल-ताशा पथकांकडून वादनाचा सराव सुरू झाला आहे. मात्र, त्याने रहिवासी त्रस्त होत असून डीजे आणि ध्वनिक्षेपकांप्रमाणे ढोल-ताशांनाही ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियम लागू करुन पथकांसाठी निवासी परिसरापासून दूर जागा निश्चित करावी, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून निगडी प्राधिकरण, रुपीनगर, त्रिवेणीनगर, सहयोगनगर, पूर्णनगर, शिवतेजनगर, शाहूनगर या भागांत ढोल-ताशा पथकांचा सराव सुरू आहे. मात्र, गणेशोत्सवाच्या जवळपास दोन महिने आधीपासून हा सराव सुरू झाला असल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये याबाबत नाराजी वाढत आहे. निगडी प्राधिकरण येथे रुग्णालये, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, हृदयरोगी, रक्तदाबाचे रुग्ण, गरोदर स्त्रिया, लहान मुले आणि ‘वर्क फ्रॉम होम’ वरील कर्मचारी, परदेशातील कॉलवर संभाषण करणारे अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवाजाच्या दणदणाटाने त्रास होत आहे.
नागरिकांचे म्हणणे काय ?
- गणेशोत्सव साजरा करण्यास कोणाचाही विरोध नाही.
- रहिवाशांच्या शांततेचा आणि आरोग्याचा अधिकारही तितकाच महत्त्वाचा
- सण, उत्सव साजरे करताना आनंदापेक्षा त्रास होणार असेल, तर त्यावर फेरविचार करावा
- ढोल-ताशांचा सराव हा सांस्कृतिक उपक्रम. पण, रहिवासी भागात ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न
- ‘ढोल-ताशे आहेत म्हणून नियम लागू होत नाहीत’ असा दुहेरी निकष असू नये
- लोकप्रतिनिधी, प्रशासन, पोलिसांनी ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांची अंमलबजावणी केली तर
सर्वसामान्य नागरिकांनीचा त्रास सहन कमी होईल.
गणेशोत्सव आणि ढोल-ताशांच्या परंपरेला आमचा विरोध नाही. मात्र, रहिवासी परिसरातील नागरिकांना दररोज मोठ्या आवाजाचा त्रास सहन करावा लागणे योग्य नाही. डीजे आणि ध्वनिक्षेपकाबाबतचे नियम असतील तर ढोल-ताशांनाही तेच नियम लागू झाले पाहिजेत. सरावासाठी रहिवासी परिसरापासून दूर योग्य जागा निश्चित करावी.
- सुनील माने, नागरिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.