धिन तक्‌ तडाड धूम .... 

प्रसाद पाठक
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

पुणे - गणेशोत्सव जवळ येतोय... नदीपात्रालगतच्या रस्त्यावर सायंकाळी फेरफटका मारा... कानावर पडेल तो ताशाचा थर्रार आणि ढोलचा निनाद... एका पथकात ऐकू येईल लावणीचा ठेका, तर दुसऱ्या पथकात आणखीनच वेगळा ठेका... मोरया, ताल, कडकलक्ष्मी यांसारखे नवनवे ताल यंदाच्या गणेशोत्सवासाठी बसविण्यात आले आहेत. 

पुणे - गणेशोत्सव जवळ येतोय... नदीपात्रालगतच्या रस्त्यावर सायंकाळी फेरफटका मारा... कानावर पडेल तो ताशाचा थर्रार आणि ढोलचा निनाद... एका पथकात ऐकू येईल लावणीचा ठेका, तर दुसऱ्या पथकात आणखीनच वेगळा ठेका... मोरया, ताल, कडकलक्ष्मी यांसारखे नवनवे ताल यंदाच्या गणेशोत्सवासाठी बसविण्यात आले आहेत. 

ढोल-ताशा पथके आणि त्यांचा ताल हे गणेशोत्सवाचे खास वैशिष्ट्य आहे. पथकांचे हे विविध ताल गणेश भक्तांना ठेका धरायला भाग पाडतात. पण, या ठेक्‍यामागे पथकांची खूप मेहनतही असते. यंदा 13 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. गणेशोत्सवाच्या अगोदर महिनाभर ढोलताशा पथके तयारीला लागतात. मुठा नदीपात्राच्या दोन्ही घाटांच्या बाजूस असलेल्या रस्त्यालगत घातलेल्या मांडवांत त्याची तयारी सुरू आहे. तरुण-तरुणी ढोल आणि ताशावर ठेका धरत नवनवे ताल बसवित आहेत. 

ढोलताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर म्हणाले, ""ताल, नाद आणि सुरातून आजची तरुणाई नावीन्य शोधत आहे. संबळ, दिमडी, ड्रमसेट एवढेच काय तर शास्त्रीय संगीताचा आधार घेऊन काही पथके वाद्यातील नावीन्य शोधत असतात. वस्तुतः ढोल-ताशा ही लोकवाद्ये आहेत. त्याला आखिव रेखीव बांधिलकी नाही. तरीही त्यातून नादमाधुर्य शोधणे ही कला आहे. त्यासाठी दाक्षिणात्य चित्रपटातील संगीत असो की लोकसंगीत, पोतराज, कडकलक्ष्मी यांच्या नैमित्तिक वादनातूनही नवीन ताल बसविण्याचे उत्कृष्ट प्रयोग ढोलताशा पथके करत आहेत.'' 

नूमवी वाद्यपथकाचे प्रमुख यज्ञेश मुंडलिक म्हणाले, ""यंदा आमच्या पथकाने अकरा नवीन ताल बसविले आहेत. त्यापैकी सहा तालांचा सरावही झाला आहे. एक-एक ताल बसविताना पथकांतील तरुण-तरुणीही उत्साहाने ठेका धरतात. ताल या चित्रपटावर आधारित "ताल' बसविला असून, लावणी, कडकलक्ष्मी, मोरया हे ताल प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतात. यंदा अखिल मंडई मंडळाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने नवे ताल बसवित आहोत.

Web Title: Dhol Tasha Pathak in Pune

टॅग्स