ढोराळे येथे दोन एकर ऊस जळून सव्वा लाखाचे नुकसान

ढोराळे येथे दोन एकर ऊस जळून सव्वा लाखाचे नुकसान
Published on: 

VRG26B06972
ढोराळे (ता. बार्शी) : येथील शेतकरी प्रभाकर चौरे यांच्या शेतातील जळालेला ऊस.
---
ढोराळेत दोन एकर उसाला
आग; सव्वा लाखाचे नुकसान
अज्ञाताने आग लावल्याची पोलिसांत तक्रार
सकाळ वृत्तसेवा
वैराग, ता. २५ : ढोराळे (ता. बार्शी) येथे शेतातील दोन एकर ऊस आगीत जळून खाक झाला. या आगीत ठिबक सिंचन संचही जळाल्याने शेतकरी प्रभाकर लक्ष्मण चौरे यांचे सुमारे सव्वालाख रुपयांचे नुकसान झाले. अज्ञात व्यक्तीने ऊस पेटवून दिल्याची तक्रार चौरे यांनी वैराग पोलिस ठाण्यात दिली आहे.
प्रभाकर चौरे यांच्या दोन एकर क्षेत्रात उसाचे पीक होते. शनिवारी (ता. २४) सकाळी शेजारील शेतकरी शिरीष काकडे यांनी त्यांना उसाला आग लागल्याची माहिती दिली. त्यानंतर चौरे हे भाऊ हरिश्चंद्र आणि पत्नी वंदना यांच्यासह शेतात गेले. त्यावेळी शेतातील उभा ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे दिसून आले. आग आटोक्यात आणण्यासाठी गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत दोन एकरांतील ऊस जळून खाक झाला होता. आगीत उसासह ठिबक सिंचन संचही जळाल्याने सुमारे एक लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी चौरे यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध वैराग पोलिसांत तक्रार दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com