

फोटो ः ध्रुवांग कंसारा
ध्रुवांग कंसाराची अष्टपैलू कामगिरी
पुणे, ता. १९ ः डीएसपी स्पोर्ट्स ॲण्ड इव्हेंट्स यांच्या वतीने आयोजित डीएसपी करंडक मान्सून लीग मिश्र कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धेत ध्रुवांग कंसाराच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर रोहन आर्यन्स लीथर संघाने प्लॅटिनम क्लबचा एकोणीस धावांनी पराभव केला.
वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लबच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना रोहन आर्यन्स लीथर संघाने सहा बाद १९२ धावा केल्या. त्यात महत्त्वाचा वाटा ध्रुवांग कंसाराने ३३ चेंडूंत पाच चौकार व सहा षटकारांसह केलेल्या ७३ धावांचा होता. प्रत्युत्तर देताना प्लॅटिनम क्लबचा डाव १७३ धावांत आटोपला. ध्रुवांग कंसाराने पाच, तर नवनाथ राजदेवने दोन गडी बाद केले. ‘सामनावीर’ हा मान ध्रुवांग कंसाराने पटकाविला.
संक्षिप्त धावफलक ः
रोहन आर्यन्स लीथर - (२० षटकांत) ६ बाद १९२ (ध्रुवांग कंसारा ७३, रॉबिन जोशी २५, साजिद रहमान २१, विनय शर्मा १-१०, आभास त्यागी १-११) विजयी विरुद्ध प्लॅटिनम क्रिकेट क्लब - (१९.४ षटकांत) सर्वबाद १७३ (ओंकार गायकवाड ३३, अनुराग त्रिपाठी २७, प्रशांत गोडियाल २७, अभिजित काळे २६, ध्रुवांग कंसारा ५-२७, नवनाथ राजदेव २-२०, राकेश गुजराथी १-२५).
---------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.