‘यिन’तर्फे ‘डिजिटल थिंकिंग’वर तरुणांशी संवाद

‘यिन’तर्फे ‘डिजिटल थिंकिंग’वर तरुणांशी संवाद

ध्रुव सेहगल, अमित जाधव, मंगेश पंडितराव, श्‍यामा मेनन यांचे मार्गदर्शन
पुणे -  ‘डिजिटल थिंकिंग’विषयी तरुणांशी संवाद साधणाऱ्या ‘यिन टॉक’ कार्यक्रमाचे ‘सकाळ’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे (यिन) आकुर्डी येथे गुरुवारी (ता. २९) आयोजन केले आहे. त्यात अभिनेते-लेखक आणि दिग्दर्शक ध्रुव सहगल, डिजिटल तज्ज्ञ व वक्ते अमित जाधव, शॉप्टिमाइजचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश पंडितराव, किलोबीटर्सच्या सहसंस्थापक श्‍यामा मेनन हे तरुणांशी संवाद साधतील. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक विवेक बिडकर, उत्सव होम्स असून, स्थळ प्रायोजक पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट हे आहेत.

ध्रुव सहगल, अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक  
‘आय एम ऑफेंडेड’सारख्या स्वतंत्र शॉर्ट फिल्मपासून, फिल्टरकॉपी आणि डाइस मीडियासाठी विविध शॉर्ट व्हिडिओ आणि वेबसीरिज अशा विविध प्रकल्पांवर त्यांनी काम केले आहे. सुधीर मिश्रा यांच्या जीवनावर आधारित ‘बावरा मन’ आणि ‘अदर इंडियन रियालिटीज अँड आय एम ऑफेंडेड’ या दोन माहितीपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक जयदीप वर्मा यांच्यासह दिग्दर्शक आणि सहसंपादक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या ‘कुणाल’ या लघुपटाला ‘मामी २०१५’ या चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला. ‘इफ पेरेंट्‌स बिव्हेड लाइक अस’, ‘कन्फ्युजिंग थिंग्ज गर्लफ्रेंड्‌स से’ आणि ‘ॲनॉइंग थिंग्ज बॉयफ्रेन्ड्‌स डू’ यासारख्या व्हिडिओंमुळे त्यांना तरुणाईने अक्षरशः डोक्‍यावर घेतले आहे.

अमित जाधव, डिजिटल तज्ज्ञ 
भारतातील आघाडीच्या वक्‍त्यांमध्ये अमित जाधव यांचे नाव आवर्जून घेतले जाते. आंतरप्रुनर्शिप, इनोव्हेशन्स, स्पीकर आणि डिजिटल या चार पिलर्सच्या माध्यमातून त्यांचा करिअरचा आलेख उंचावत गेला आहे. आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी मॉडेलकॅम टेक्‍नॉलॉजिस, कुलआचार्य डॉट.कॉम, टास्कमार्केटिंग.इन यासारख्या कंपन्यांचे ते संस्थापक आहेत. डिजिटल माध्यमांची भावी काळातील गरज व विकास ओळखून त्यांनी ‘इंटरनेट एज-मार्केटिंग विथ सोशल मीडिया’ हे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे. 

मंगेश पंडितराव,  मुख्य कार्यकारी अधिकारी, शॉप्टिमाइझ 
सॉफ्टवेअर आणि ऑपरेशन्सवर उत्तम पकड असणारे मंगेश यांनी पुणे विद्यापीठातून बीई व अमेरिकेतून इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंगमधून मास्टर्स केले आहे. शाप्टिमाइझमध्ये प्रॉडक्‍ट स्ट्रॅटेजीवर ते काम करतात. 

श्‍यामा मेनन, सहसंस्थापक, किलोबीटर्स 
जेवण तयार करण्याची आवड व फिटनेसची पॅशन याचे रूपांतर व्यवसायात करणाऱ्या श्‍यामा मेनन यांनी ‘किलोबीटर्स’ नावाची स्वतंत्र ऑनलाइन कंपनी सुरू केली. ही कंपनी प्रत्येकाच्या बीएमआयनुसार आहाराची आखणी करते. त्यानुसार योग्य प्लॅनिंगनुसार ते ग्राहकाला घरपोच दिले जाते. आजच्या फास्ट व डिजिटल युगात तुमच्या आरोग्याची काळजी किलोबीटर्स योग्यरीतीने घेते.

स्थळ : एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर अँड डिझाईन, आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ, निगडी- प्राधिकरण 
वेळ : सकाळी ११ वाजता
प्रवेश मोफत 
नोंदणीसाठी संपर्क : ९६०४४१७५७५, ९०७५००७९५८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com