Pune News : स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाला ‘डीआयएटी’चे बळ; अत्याधुनिक लेझर आणि फोटॉनिक्स प्रणाली विकसित करणार

‘डीआयएटी’ला दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी सुमारे ४४.४२ कोटींचा निधी.
DIAT

DIAT

sakal

Updated on: 

- प्रज्वल रामटेके

पुणे - संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी तंत्रज्ञान विकासाला चालना देण्यासाठी ‘संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्था’ (डीआयएटी) अत्याधुनिक लेझर आणि फोटॉनिक्स (छायाप्रकाशीय) तंत्रज्ञानावर आधारित दोन महत्त्वाचे संशोधन प्रकल्प राबवीत आहे. यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) सुमारे ४४ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या संशोधनातून अत्याधुनिक लेझर प्रणाली आणि शत्रूच्या रडार संकेतांचा शोध घेणारी यंत्रणा विकसित करण्यात येणार असून, या मुळे भविष्यातील संरक्षण सज्जता आणि इलेक्ट्रॉनिक युद्धक्षमता अधिक सक्षम करण्यास मदत होणार आहे.

Loading content, please wait...