Pune News : स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जाहीर केलेल्या सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञांच्या यादीत डीआयएटीचे प्राध्यापक

डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्‍स्ड टेक्नॉलॉजीच्या (डीआयएटी) प्राध्यापकांनी स्‍टॅनफोर्ड विद्यापीठाने जाहीर केलेल्या जगातील सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञांच्या यादीत मानाचे स्थान प्राप्त केले आहे.
DIAT Professors
DIAT Professorssakal

पुणे - येथील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्‍स्ड टेक्नॉलॉजीच्या (डीआयएटी) प्राध्यापकांनी स्‍टॅनफोर्ड विद्यापीठाने जाहीर केलेल्या जगातील सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञांच्या यादीत मानाचे स्थान प्राप्त केले आहे. यामुळे संरक्षण क्षेत्राबरोबरच पुण्यासाठी देखील ही अत्यंत अभिमानाची बाब ठरत आहे.

स्टॅनफोर्ड विद्यापीठ दरवर्षी वैज्ञानिक क्षेत्रातील आघाडीच्या २ टक्के शास्त्रज्ञांचा समावेश असलेली यादी जाहीर करते. यामध्ये जगभरातील शास्त्रज्ञांच्या समावेश असतो. यामध्ये शास्त्रज्ञांचे संशोधन, शोधनिबंधाची संख्या व दर्जा आदींच्या आधारावर जागतिक स्तरावरील क्रमवारी जाहीर केली जाते. कार्यक्षम शास्त्रज्ञांची माहिती देणारी ही यादी जगात प्रतिष्ठेची मानली जाते. तर यंदा यामध्ये डीआयएटीच्या चार प्राध्यापकांच्या नावाचा देखील समावेश करण्यात आला आहे.

संरक्षण संबंधित तंत्रज्ञानाच्या प्रकाशनात विविध आव्हाने असली तरी, डीआयएटीच्या या प्राध्यापकांना संशोधन व तंत्रज्ञान, प्रणाली निर्मितीमध्ये उत्तीर्ण कामगिरी केली आहे. त्यात प्रा. बालासुब्रमण्यन के, रासायनिक शाखेसाठी प्रा. पी. के. खन्ना आणि प्रा. पी. कुलकर्णी तसेच इलेक्‍ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगसाठी डॉ. बझील राज यांचे नाव या यादीमध्ये झळकले आहे.

नुकतेच डीआयएटीच्या प्राध्यापकांना ‘फेलो ऑफ रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री’ आणि ‘फेलो ऑफ इंडियन नॅशनल ॲकॅडमी ऑफ इंजिनिअर्स’ने देखील सन्मानित करण्यात आले आहे.

संरक्षण संशोधन व विकास संस्थे (डीआरडीओ) अंतर्गत चालणारी एकमेव लष्करी अभिमत विद्यापीठ म्हणजेच डीआयएटी. संरक्षण क्षेत्रातील आवश्‍यक प्रणाली, नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा विकास, भविष्यातील तंत्रज्ञानामध्ये शिक्षण, प्रशिक्षण तसेच उत्कृष्ट संशोधनासाठी डीआयएटी सातत्याने कार्यरत आहे. संरक्षणाशी निगडित स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारी विद्यापीठ म्हणून डीआयएटीची ओळख निर्माण होत आहे.

दरम्यान या यशाबद्दल डीआयएटीचे कुलगुरू डॉ. सी. पी. रामनारायणन म्हणाले, ‘आत्मनिर्भर भारत या संकल्पनेच्या माध्यमातून राष्ट्राची सुरक्षा पूर्ण करण्यासाठी डीआयएटीतील विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी व प्राध्यापक एकत्रितपणे काम करण्यास सज्ज आहेत.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com