esakal | डिझेलची चोरी करणाऱ्या टोळीस अटक
sakal

बोलून बातमी शोधा

डिझेलची चोरी करणाऱ्या टोळीस अटक

डिझेलची चोरी करणाऱ्या टोळीस अटक

sakal_logo
By
जनार्दन दांडगे, उरुळी कांचन

लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गालगत पार्किंगला थांबलेल्या गाड्यांमधून डिझेलची चोरी करणाऱ्या एका टोळीला लोणी काळभोर पोलिसांनी कदमवाक वस्ती) ग्रामपंचायत हद्दीतील एमआयटी कॉर्नरच्या परिसरात बुधवारी (ता. १६) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अटक केली. योगेश नवनाथ गायकवाड (वय-३०, रा. गोकुळधाम कॉलनी, मांजरी, ता. हवेली. मुळगाव मु. पो. चटारा, ता. बीड, जि. बीड), गणेश विठ्ठल जाधव, (वय-४९, रा. कुलर बायो प्लॉटच्या बाजुस, ग्रीन भंडारी हाईट्स, मुंढवा, ता. हवेली) सौरभ सुरेश जगताप (वय १९, रा. मांजरी म्हसोबा वस्ती, गल्ली नं. १, गावठी निवास मांजरी, हडपसर), गणेश शरगप्पा शेरे (वय- २०, रा. लोणकर वस्ती पवन मेडीकल हुड, सोसायटी समोर, केशवनगर, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा: पुणे विमानतळावर जाण्यासाठी 5 डेपोंमधून बससेवा

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन महिन्यांपूर्वी पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचातीच्या हद्दीतील गुजर वस्ती परिसरात श्री दत्त ट्रान्सपोर्टच्या पार्किंगला लावलेल्या चार ट्रकमधून डिझेलची चोरी झाली होती. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मिकाशी आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नितिन गायकवाड, राजेश दराडे, गणेश सातपुते आणि श्रीनाथ जाधव यांचे पथक तयार करण्यात आले होते.

हेही वाचा: सावधान! पुणे बंगळूर महामार्गाची वाहतुक संथ गतीने; काेयनेत जाेर

सदर पथकाला डिझेलची चोरी करणारे वरिल चारही आरोपी पुणे-सोलापुर महामार्गाच्या शेजारी असलेल्या एमआयटी कॉलेज जवळील रेल्वेच्या बोगदयाजवळ थांबले असल्याची माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पथकाने सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, वरील चारही आरोपी सदर ठिकाणी आड बाजूला थांबल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अधिक माहिती विचारली असता, त्यांचा गुजरवस्ती येथील डिझेल चोरीच्या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे निश्चीत झाले आहे. दरम्यान, पुणे-सोलापूर महामार्गाच्या शेजारी पार्क केलेल्या गाड्यांमधील डिलेझची चोरी जाण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढले होते. मागील चार दिवसांपूर्वी उरुळी कांचन परिसरातील सहा आरोपींना डिझेल चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती. त्यातच बुधवारी (ता. १६) आणखी चार आरोपींना पकडले आहे.

loading image
go to top