विद्यार्थ्यांचा ‘लर्निंग लॉस’ भरून काढण्यासाठी ‘डाएट’चे प्रयत्न

कोरोनाच्या संसर्गामुळे वर्षभरात विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी आता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने (पुणे) पुढाकार घेतला आहे.
Education
EducationSakal

पुणे - कोरोनाच्या संसर्गामुळे (Corona Infection) वर्षभरात विद्यार्थ्यांचे (Student) झालेले शैक्षणिक नुकसान (Educational Loss) भरून काढण्यासाठी आता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने (पुणे) पुढाकार घेतला आहे. कृतीशील उपक्रमाच्या आधारे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील (Syllabus) संकल्पना समजाव्यात, म्हणून शिक्षक (Teacher) आणि पालकांच्या (Parents) मदतीने विशेष कार्यक्रमाची आखणी संस्थेने केली असून त्याद्वारे अध्ययन नुकसान भरून काढण्यास सुरूवात केली आहे. (Diet Efforts to Offset Students Learning Losses)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेषकरून प्राथमिक शाळा बंद होत्या. नियमित पद्धतीने अध्ययन-अध्यापन न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे काही प्रमाणात अध्ययन नुकसान (लर्निंग लॉस) झाला आहे. विद्यार्थ्यांचे हे नुकसान कमी न केल्यास पुढील शैक्षणिक वर्षात (२०२१-२२) निश्चिपणे अडचणींचा डोंगर उभार राहणार आहे. त्यामुळेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डाएट) वतीने मर्यादित कालावधीसाठी ‘विद्यार्थी अध्ययन सुधारात्मक कार्यक्रम’ (लर्निंग लॉस रिकव्हरी प्रोग्रॅम) तयार केल्याची माहिती संस्थेतील मूल्यमापन व माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. राजेश बनकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. यात मराठी, गणित विषयांमधील मुलभुत क्षमता, मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाला पुरक कृतीवर भर दिला जात आहे. मे महिन्याच्या अखेरीस (३१ मे) कार्यक्रमास सुरवात झाली आहे. सहा आठवड्याचा हा कृतियुक्त कार्यक्रम ११ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.

Education
पुण्यात दमदार पाऊस; शहरभर धुवांधार ते संततधार सुरुच!

‘अध्ययन नुकसान’ हे भरून काढण्यात येईल :

विषय : अध्ययनात यावर असेल भर

- मराठी : श्रवण, वाचन, भाषण-संभाषण, लेखन क्षमता

- गणित : इयत्तानिहाय संख्याज्ञान, संख्यांवरील क्रिया (बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार)

- व्यक्तिमत्व विकास व सामाजिक व भावनिक शिक्षण : जीवनविषयक कौशल्य प्राप्तीसाठी कृती, शिक्षणाबाबत उत्सुकता निर्माण करणे, व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या वयोगटानुरूप सुलभ कृती

‘गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे नुकसान झाले आहे का, अभ्यासक्रम भरून काढण्यासाठी कार्यक्रम आखणी करण्यापूर्वी सर्वेक्षण करण्यात आले. यात जवळपास १५ हजारांहुन अधिक पालक-शिक्षकांनी अध्ययन सुधारात्मक कार्यक्रम आखणीला सकारात्मकता दर्शविली. त्यानुसार ‘विद्यार्थी अध्ययन सुधारात्मक कार्यक्रम’ आखला आहे. यात पालकांची मध्यवर्ती भूमिका आहे. तज्ञ शिक्षकांकडून आठवडानिहाय कार्यक्रम आखला आहे. यात इयत्तेनुसार विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी काय करायचे हे सांगितले आहे. दर आठवड्याच्या शेवटी चाचणी घेण्याची सूचना आहे. शिक्षकांमार्फत पालकांपर्यंत कार्यक्रमाची माहिती पुरविली जात आहे.’’

- डॉ. राजेश बनकर, विभाग प्रमुख (मूल्यमापन व माहिती तंत्रज्ञान), जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट), पुणे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने मुलांचे अध्ययन नुकसान झाले आहे, असे तुम्हाला वाटते का!

तपशील : पालक (प्रतिसादाची टक्केवारी : शिक्षक (प्रतिसादाची टक्केवारी)

अध्ययन नुकसान झाले नाही : ११ टक्के : ६ टक्के

काही प्रमाणात अध्ययन झाले : ५६ टक्के : ६६ टक्के

मोठ्या प्रमाणात नुकसान झाले : ३३ टक्के : २८ टक्के

अध्ययन नुकसान झाले (एकूण) : ८९ टक्के : ९४ टक्के

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com