बारामती - राजकीय विचारधारा वेगळी असली तरी कुटुंब म्हणून आम्ही एकमेकांच्या सुख दुःखात एक असतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. .वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटच्या बैठकीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, जयंत पाटील व अजित पवार यांची बंद दरवाजाआड चर्चा झाली, त्या बारामतीत आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, उसाच्या शेतीत एआय तंत्रज्ञान वापरण्यासंदर्भात ती बैठक होती, त्यात राजकीय चर्चा काही झाली नाही. या केवळ माध्यमांनी दिलेल्या बातम्या होत्या.दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का या बाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, माझ्या मुलाच्या साखरपुडयात सगळेच कुटुंबिय आम्ही एकत्र होतो. राजकीय विचारधारा जरी वेगळी असली तरी सुख दुःखाच्या प्रसंगात कुटुंब म्हणून आम्ही एकमेकांसोबतच असतो..इतर संस्थांवर संधी देऊ.....माळेगावच्या निवडणूकीत ज्यांना पॅनेलमध्य संधी मिळणार नाही, त्यांना आमच्या ताब्यात असलेल्या इतर संस्थांवर संधी देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही देखील अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. मागणी प्रचंड व जागा मर्यादीत असल्याने सर्वांना संधी मिळणार नाही पण काही जणांना इतरत्र सामावून घेऊ, असे ते म्हणाले..यंदा 30 लाख मेट्रीक टन साखऱ उत्पादन कमी....साखर आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा 221 लाख 74 हजार मेट्रीक टन गाळप कमी झाले, त्या मुळे 30 लाख मेट्रीक टन साखर कमी उत्पादीत झाली आहे. दुसरीकडे 92 कारखान्यांनी सभासदांची 864 कोटी रुपयांची एफआरपीची रक्कमही थकविली आहे. यापैकी 20 कारखान्यांवर कारवाई झाली असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले..एआय संदर्भात 9 जून रोजी पुन्हा बैठक....कारखाने 90 दिवस चालविणे हे परवडणारे नाही, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे, या पार्श्वभूमीवर 9 जून रोजी वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट मध्ये पुन्हा एआयचा वापर वाढविण्यासंदर्भात महत्वाच्या बैठकीचे आयोजन केले असल्याचेही अजित पवार यांनी नमूद केले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.