बाजारात राख्यांच्या वेगवेगळ्या प्रकारांची रेलचेल परंतु राख्यांचा तुटवडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rakhi

कोरोना नंतरच पहिल्यांदाच नियमनमुक्त रखीपोर्णिमा सन हा दहा दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे बाजारात राख्यांची रेलचेल सुरू आहे.

बाजारात राख्यांच्या वेगवेगळ्या प्रकारांची रेलचेल परंतु राख्यांचा तुटवडा

स्वारगेट - कोरोना नंतरच पहिल्यांदाच नियमनमुक्त रखीपोर्णिमा सन हा दहा दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे बाजारात राख्यांची रेलचेल सुरू आहे. यामध्ये राख्यांचे बरेच प्रकार पाहायला मिळत आहेत. नागरीक मोठ्या संख्येने बाजारात खरेदीसाठी येत आहेत. फॅन्सी, पेंडत, स्टोन, झरदोजी, लुंबा, डोरी राखी हे राख्यांचे प्रकार पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर किड्स, पर्यावरण पूरक सीड राखी व कपल राखी (भैय्या भाभी) अशा अनेक प्रकारच्या राखी आहेत. कोरोनाच्या नंतर दोन वर्षानी हा सण उत्साहात साजरा होत असताना ग्राहक आपल्या पसंतीची राखी खरेदी करण्यासाठी येत आहेत. यामध्ये स्पंज राखीला ज्येष्ठ नागरिक पसंती देत आहेत तर फॅन्सी राख्यांना तरुणाई पसंती देत आहे.

हिंदू धर्मातील श्रावण महिन्यातील पौर्णिमेला

मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने भाऊ-बहीण या सणची वाट पाहात असतात. या दिवशी बहिणी आपल्या भावाला राखी बांधते मात्र सद्या बाजारात ग्राहकांना राखी आकर्षित करीत असली तरी त्या तुलनेने बाजारात राख्या कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र ग्राहकांची मागणी वाढत आहे. दूरगावी असलेल्या बांधवाला पाठवायची हवी तशी राखी कुठे मिळेल या शोधात समस्त भगिणी असताना बाजारात राख्यांची संख्या कमी असलेली दिसते. रक्षाबंधन तोंडावर आले असताना बाजारात अपेक्षित प्रमाणात राखी उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. मात्र दुसरीकडे राखीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

कच्चा माल वाहतुक, पेट्रोल वाढ यामुळे राख्यांचे वीस ते तीस टक्के दर वाढले आहेत. सद्या कलकत्ता, दिल्ली, हैदराबाद, अहमदाबाद, गुजरात येथुन राख्या येत आहेत. ग्राहक राख्या खरेदी करताना पर्यावरण पूरक राख्यांनाही मोठी पसंती देत आहेत. अशीच पर्यावरण पूरक असणारी गोमय बीज राखी ही ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे.

मागणी जास्त असली तरी सद्या पुरवठा कमी आहे. त्यामुळे बाजारात राख्यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. ग्राहक फॅन्सी राख्यांना पसंती देत आहेत

- अभिजित बांदल (राखी व्यापारी)

तयार होणाऱ्या रख्या ह्या उलन, कॉटन, रेशमी धाग्यापासून तयार होत असतात यामध्ये रेशमी धाग्यापासून तयार झालेल्या राखीला बाजारात मागणी आहे.

- रितेश अग्रवाल (राखी व्यापारी)

Web Title: Different Types Of Rakhis Are Available In Market But Shortage Of Rakhis

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :puneRakhiRakhi Purnima