पुण्यातल्या कोरोना कॉल सेंटरवर मदतीसाठी येताहेत फोन; कुणी बेड देता का बेड?

पुण्यातल्या कोरोना कॉल सेंटरवर मदतीसाठी येताहेत फोन; कुणी बेड देता का बेड?

पुणे - शहरांमधील रुग्णांना रुग्णालयात उपचारांसाठी बेड मिळणे अवघड झालंय. सगळीकडे पायपीट आणि फोना-फोनी करून हवालदिल झालेले नातेवाईक आता मदतीसाठी राज्याच्या कोरोना कॉल सेंटरकडे वळत असल्याचा कल गेल्या दोन-तीन दिवसांपासून दिसतो. यात पुण्या-मुंबईतून येणाऱ्या कॉलची संख्या मोठी आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेतल्याने पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमधील सरकारी रुग्णालयांची क्षमता संपली आहे. त्यामुळे आता उपचारांसाठी खासगी रुग्णालयांची मदत घेण्यात येत आहे. पण, त्याच वेळी कोरोनाचा संसर्ग नसलेल्या इतर आजारांच्या रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयांमधून खाटा मिळणे कठीणझाले आहे. हाच सूर कॉल सेंटरमधूनही निघाला आहे. रुग्णालयात खाटा मिळत नाहीत, कुठल्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होता येईल, कोणत्या रुग्णालयात जागा आहे, अशा कॉलची संख्या वाढत आहे. या बदललेल्या ट्रेंडने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

कसे आहे कॉल सेंटर? 
कोरोनाबाबत हेल्पलाईनसाठी राज्याचे कॉल सेंटर पुण्यात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. यासाठी आठ फोनच्या स्वतंत्र लाइन दिवस-रात्र उपलब्ध करून दिल्या आहेत. दररोज चोवीस तास या कंट्रोल रुममधील फोन खणखणत असतात. आठ तासांच्या एका शिफ्टमध्ये सुमारे सहाशे ते आठशे कॉल येतात. दिवसभरात या कॉलची संख्या सुमारे दोन हजारच्या आसपास जाते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

कॉल सेंटरचे ट्रेंड 
1. कोरोनाचा संसर्गबद्दलच्या शंका 

कोरोनाच्या रुग्णांचे निदान सुरवातीला होऊ लागल्यानंतर या कॉल सेंटरमध्ये कोरोनाबाबत अधिकृत माहिती विचारणारे फोन येत होते. 

2. जेवण, रेशनबद्दलची माहिती 
मार्चमध्ये पहिले लॉकडाऊन सुरू झाले. एक-एक उद्योग बंद होऊ लागले. बांधकामे थांबले. मजुरांच्या हाताचे काम सुटले. त्यानंतर जेवण-खाण कुठे मिळेल, रेशन दुकानातून धान्य कुठे मिळेल, असे फोन सुरू झाले. बहुतांश कॉल परराज्यातून महाराष्ट्रात काम करण्यासाठी आलेल्या मजुरांचे असायचे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

3. लॅब टेस्टिंगबद्दलची चौकशी 
लक्षणे नसतानाही कोरोनाचा संसर्ग झालेल्याची भीती नागरिकांमध्ये वाढली. त्यातून एप्रिलच्या मध्यापासून लॅब टेस्टिंगची विचारणा करणारे फोन वाढले. हा कल साधारणतः मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू होता. त्यात कोणी टेस्ट करावी, ती कुठे करावी, असे प्रश्न होते. 

4. ई-पासची उत्सुकता 
देशात तिसऱ्या लॉकडाऊनच्या शेवटच्या टप्प्यात राज्यातील मजुरांना त्यांच्या गावापर्यंत सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यासाठी ई-पासची सुविधा कुठे आहे, तो कसा मिळणार, त्यासाठी काय करावे, लागणार अशी माहिती घेण्यासाठी कॉल सेंटरवर फोन करणाऱ्यांची संख्या वाढली. 

5. स्थलांतरीत मजुरांची कैफियत 
ई-पास घेऊन आपापल्या राज्यात गेलेल्या नागरिकांच्या फोनने पुन्हा कॉलसेंटरचे फोन खणखणू लागले. आता कारण, असं होत की, महाराष्ट्रातून त्यांच्या राज्यात गेलेल्या नागरिकांना त्यांच्याच लोकांनी गावात प्रवेश बंद केला आहे. परराज्यातील नागरिक फोन करून सांगतात, की महाराष्ट्रात आम्हाला काम मिळालंच, पण लॉकडाउनमध्ये दोन्ही वेळेला पोटभर जेवणही 
मिळालं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com