

दिगंबर मुनी सहज मिळत नाहीत, त्यांची कदर करा
सुप्रभ सागर महाराज; गुरूंच्या मार्गावर प्रणत सागर महाराजांची १४ वर्षे साधना
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ७ : दिगंबर जैन मुनी थंडी, ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता अनवाणी विहार करतात. ही कठीण तपश्चर्या असून दिगंबर दीक्षा पंचम काळातील जगातील आठवे आश्चर्य आहे. दिगंबर निर्ग्रंथ मुनींचे दर्शन, त्यांना आहार देणे आणि वैयावृत्ती करण्यासाठी भाग्य लागते. त्यामुळे दिगंबर मुनींची कदर करा, त्यांच्याविषयी छलकपट न करता आत्मीयता, प्रेम व वात्सल्य ठेवा, असे आवाहन १०८ सुप्रभ सागर महाराज यांनी केले.
जुळे सोलापूर येथे १०८ प्रणत सागर महाराज यांच्या १४ व्या दीक्षा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गुरूंच्या मार्गावर चालत प्रणत सागर महाराज यांनी साधनेची १४ वर्षे पूर्ण केली. परमपूज्य गणाचार्य विराग सागरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने परमपूज्य पट्टाचार्य श्री विशुद्ध सागरजी महाराज यांच्याकडे ६ ऑक्टोबर २०१३ रोजी त्यांनी दिगंबर दीक्षा घेतली होती. धर्मानुरागी साहिल अजित शहा भुमकर यांच्या वसंतनगर येथील निवासस्थानी हा सोहळा झाला. यावेळी प्रणत सागर मुनींचे गुरुपूजन, पादप्रक्षालन व शास्त्रभेट करण्यात आली.
-----------------------------
PNE26W55561
गुरूंच्या आश्रयामुळे साधनेचा मार्ग : प्रणत सागर महाराज
प्रणत सागर महाराज यांनी गुरूंचे महत्त्व सांगितले. गुरूंच्या मार्गदर्शनामुळे श्रावकाचे कल्याण होते. गुरू वात्सल्य देऊन मोक्षमार्गावर जाण्यास मदत करतात. सुप्रभ सागर महाराज यांच्या मार्गदर्शनातून ‘जीवन जीने की शिक्षा, निभना निभाना सिखा’ शिकलो. गुरूंच्या उपकारामुळेच दीक्षा, आश्रय आणि दिगंबर साधना सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सुप्रभ सागर महाराज यांनी प्रणत सागर महाराज हे गुरुबंधू असून त्यांचे समर्पण मोलाचे असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.