

Midnight Chase: Gunfight Near Sonesangvi Village Sparks High Alert in Shirur
शिरूर : दिघी येथे गोळीबार करून पळून चाललेल्या आरोपींनी आपल्या मागावरील पोलिसांवरही गोळीबार केल्याने खळबळ उडाली. सोनेसांगवी (ता. शिरूर) गावाजवळ आज रात्री सातच्या सुमारास ही घटना घडली असून, गोळीबार करणारे आरोपी दूचाकी रस्त्यावरच सोडून शेतात पळून गेल्याने त्यांच्या शोधासाठी पिंपरी - चिंचवड येथील पोलिस पथकासह शिरूर व रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याची पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत.