

पुणे : ‘तुमच्या बँक खात्यांचा वापर मनी लाँड्रिंगसाठी झाला आहे. तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आले आहे,’ असा बनाव रचून सायबर चोरट्यांनी कोंढवा परिसरातील एका महिलेची चार कोटी ८२ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.