ज्येष्ठ महिलेची १२ लाखांची फसवणूक

ज्येष्ठ महिलेची १२ लाखांची फसवणूक
Published on

पुणे, ता. ११ : डिजिटल अरेस्टची बतावणी करून फसवणूक झाल्याचा आणखी एक प्रकार पुढे आला आहे. सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेची १२ लाखांची फसवणूक केली. दरम्यान, एका ज्येष्ठ वकील महिलेची ७० लाखांची फसवणूक करण्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या मोबाईलवर सायबर चोरट्यांनी पाच ऑगस्टला संपर्क साधून पोलिस असल्याची बतावणी केली. ‘तुमच्या आधारकार्डचा गैरवापर करण्यात आला असून, अटक वाॅरंट बजाविण्यात येणार आहे. या प्रकरणात तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात येणार आहे,’ अशी भीती दाखविली. अटक टाळण्यासाठी तातडीने बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. घाबरलेल्या महिलेने चोरट्यांच्या खात्यात १२ लाख रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने तक्रार दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com