

Pune Police Roll Out ITMS to Enforce Traffic Rules with E-Challans
esakal
पुणे: शहरातील बेशिस्त वाहनचालकांना चाप लावण्यासाठी पुणे पोलिसांकडून ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम’(आयटीएमएस) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या माध्यमातून आता वाहतूक नियम मोडणाऱ्यांना थेट स्वयंचलित पद्धतीने ई-चलन पाठवले जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली.