डिजिटल मार्केटिंग बूट कॅम्प

डिजिटल मार्केटिंग बूट कॅम्प
Published on

पुणे, ता. २१ : रिअल इस्टेट एजंटसाठी डिजिटल मार्केटिंगची कौशल्ये शिकवणारा विशेष बूटकॅम्प ३ जूनपासून सुरु होणार आहे. डिजिटल मार्केटिंगमुळे कमीत कमी गुंतवणुकीत, ठराविक ग्राहक वर्गापर्यंत अचूकपणे पोहोचता येते. रिअल इस्टेट क्षेत्रात तर ‘मार्केटिंग’चे अधिकच महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर खास रिअल इस्टेट एजंटसाठी केंद्रित तीन दिवसीय ऑनलाइन बूट कॅम्प आयोजिला आहे. यामध्ये सर्च, डिस्प्ले, रीमार्केटिंग, युट्युब, सोशल मीडिया, लीड जनरेशन, कन्व्हर्जन, पेज लाईक इत्यादी कॅम्पेन कसे चालवावे, लिंक्डडीन, कॅन्व्हा, चॅटजीपीटी यांचा डिजिटल मार्केटिंगमध्ये कसा उपयोग करावा, याची माहिती दिली जाणार आहे.
संपर्क : ७३५०००१६०३

व्यावसायिक चाट, स्नॅक्स कार्यशाळा
चटपटीत चाट व स्नॅक्सचा व्यवसाय सुरु करायचा असल्यास नेमकी काय पूर्वतयारी करावी, याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा २५ व २६ मे रोजी आयोजिली आहे. यामध्ये स्पेशल मिसळ, कटवडा, शाबू वडा, उपवासाचे पॅटीस व मिसळ, व्हेज बॉल्स, चीज कटलेट, वेगवेगळ्या पद्धतीच्या चटण्या व पराठ्याचे प्रकार कसे करावेत हे प्रात्यक्षिकासह शिकवले जाणार आहे. तसेच चाट स्पेशल पदार्थांमध्ये गोड व हिरवी चटणी, पाणीपुरी, आलू दहीपुरी, रगडा पॅटीस, मटकी भेळ, कोल्हापुरी स्पेशल भेळ, आलू टिक्की चाट, पकोडा चाट, इडली चाट, कॉर्न चाट, चना चाट, पापड चुरी चाट, पापडी चाट, दही वडा इत्यादी पदार्थ शिकवले जातील. व्यवसायाची सुरुवात, नोंदणी, ब्रॅंडिंग, अन्न सुरक्षा मानके आदींबाबत माहिती दिली जाईल.
संपर्क : ९१४६०३८०३१

दुग्ध प्रक्रिया व्यवसाय कार्यशाळा
दूध प्रक्रिया व्यवसाय कसा सुरू करावा, या उद्योगातील संधी, दूध संकलन, साठवण, पारंपरिक आणि नवनवीन दर्जेदार दुग्ध पदार्थ कसे तयार करावे, यंत्रसामग्रीची माहिती, प्रकल्प आराखडा, मार्केटिंग, पॅकेजिंग, ब्रॅंडिंग, अन्न प्रशासन परवाना, बँक फायनान्स आदींविषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा २५ व २६ मे रोजी आयोजिली आहे. दुधाचा, दुग्धपदार्थांचा दर्जा उत्तम कसा राखावा, त्यातील भेसळ कशी ओळखावी यांसह यशस्वी दूध प्रक्रिया उद्योजकांचे अनुभव ऐकण्याची संधी आहे. पनीर, खवा, पेढा, लस्सी या पदार्थांचे थेट प्रात्यक्षिक पाहता येईल.
संपर्क : ८९५६३४४४७२

औषधी वनस्पती लागवड व प्रक्रिया उद्योग
आयुर्वेदिक व सेंद्रिय उत्पादनांना ग्राहकांकडून मागणी जास्त असल्याने गेल्या काही वर्षात औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीची गरज वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वनौषधींची लागवड पद्धती व प्रक्रिया उद्योगाविषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा २६ मे रोजी आयोजिली आहे. यामध्ये वनौषधी व सुगंधी वनस्पतींचे शेतजमिनीला होणारे फायदे, वनस्पती लागवडीचे तंत्र, नर्सरीचे तंत्र, प्राथमिक प्रक्रिया आणि मूल्यवर्धन, सरकारी योजना, मार्केटिंग आदींविषयी मार्गदर्शन केले जाईल. प्रात्यक्षिक अनुभवासाठी थेट औषधी वनस्पतींच्या उद्यानात जाऊन वनस्पतींविषयी माहिती करून दिली जाणार आहे.
संपर्क : ९१४६०३८०३१
वरील सर्व कार्यशाळा व प्रशिक्षणे सशुल्क असून त्यांचे ठिकाण : सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com