विधायक...... अनगरमधील सायंकाळी ७ ते ९ मोबाईल टि व्ही बंद या विधायक संकल्पास नागरिकांतून वाढता पाठींबा - प्राजक्ता पाटील
लोगो : विधायक
---
अनगरमध्ये ‘डिजिटल सायलेन्स’चा प्रयोग
सायंकाळी ७ ते ९ मोबाईल-टीव्ही बंद; न.पं.चा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
अनगर, ता. २९ : मोहोळ तालुक्यातील अनगरमध्ये प्रजासत्ताक दिनापासून सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत ‘डिजिटल सायलेन्स’चा प्रयोग सुरू झाला आहे. या अनोख्या प्रयोगात मोबाईल अन् टीव्ही बंद ठेवण्याचा अनोखा संकल्प राबविण्यात आला आहे. या संकल्पनेस नागरिकांतून वाढता पाठिंबा मिळत असल्याचे व तशी दृश्ये गावात ठिकठिकाणी पाहायला मिळत असल्याचे या संकल्पनेच्या मुख्य व अनगरच्या नगराध्यक्षा प्राजक्ता पाटील यांनी ‘सकाळ’ला सांगितले. या संकल्पनेचे पालक व ग्रामस्थांनी स्वागत केले आहे
सध्या विद्यार्थ्यांबरोबरच मोठ्या व्यक्तींनाही मोबाईल व टीव्ही पाहण्याचे व्यसनच लागल्याचे दिसत आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत असल्याने अनगर नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षा प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांनी सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील, लोकनेते साखर कारखान्याचे अध्यक्ष विक्रांत पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या मार्गदर्शक सल्ल्याने व सहकारी नगरसेवकांच्या सहकार्याने अनगर गावात प्रजासत्ताक दिनापासून दररोज सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत कोणीही विद्यार्थी व ग्रामस्थ महत्त्वाच्या कामाशिवाय मोबाईल आणि टीव्ही सुरू करणार नाही. घरातील विद्यार्थ्यांना अभ्यासात व्यत्यय येईल अशा दोन्हीही प्रसारमाध्यमांचा वापर करणार नाही, याची दक्षता त्या स्वतः जातीने घेत असल्याचे सांगितले.
---
कोट
ANR26B02860
या विधायक निर्णयामुळे शालेय विद्यार्थ्यांबरोबरच सर्वांचे मोबाईल व टीव्ही बंद राहून नागरिक मोबाईलच्या बाहेर येऊन एकमेकांशी संवाद साधत आहेत, गप्पा मारत आहेत. असा एक चांगला पायंडा गावात सुरू आहे, यात आनंद आहे.
- प्राजक्ता पाटील, नगराध्यक्षा, अनगर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

